नको असलेली प्रेग्नेंसी थांबविण्याचा सोपा उपाय.!

 नको असलेली प्रेग्नेंसी

थांबविण्याचा सोपा

उपाय.! अंतरा



खामगाव (जनोपचार सेवा) :अनेकदा नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी जोडपे

चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टीचा अवलंब करतात. चुकून गर्भधारणा झालीच तर गर्भपातासाठी सुद्धा परवानगी नसलेली औषधे घेऊन चुकीच्या मार्गाने गर्भपात केल्या जातो. मात्र शासनाच्या आरोग्य विभागाने यासाठी सोपा उपाय उपलब्ध करून दिला आहे. गर्भधारणा होऊ देण्याची इच्छा नसल्यास तीन महिन्यातून एकदा "अंतरा" हे इंजेक्शन घेतल्यास पाळणा तीन महिने लांबवने

सहज शक्य आहे.

विशेष म्हणजे हे गर्भनिरोधक औषध शासनाच्या वतीने

मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधी या इंजेक्शन बाबत गैरसमज होते मात्र अलीकडच्या काळात महिला या सोप्या उपायाला प्राधान्य देत आहेत. एक अपत्य झाल्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून "अंतरा" हे गर्भनिरोधक औषध प्रभावी आहे. या इंजेक्शन

मुळे महिलांचा रक्तक्षय व बिजांडाच्या कर्करोगापासून

बचाव होतो. लैंगिक संबंधांवर कोणताही परिणाम होत

नाही. हे इंजेक्शन वापरल्यानंतर शारीरिकदृष्ट्या कोणतेही दुष्परिणाम जाणवत नसल्याचे महिला रोग तज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात "अंतरा"

हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहे.

त्यामुळे अंतरा हे इंजेक्शन कायदेशीर अन फायदेशीर ठरत

आहे.

Post a Comment

Previous Post Next Post