भारत जोडो यात्रा व संविधान जागृती समारंभ

 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. मल्लिकार्जुन खरगे साहेब याचे अभिनंदनपर कार्यक्रमाचे  दि. २९   आक्टोंबर रोजी आयोजन 

भारत जोडो यात्रा व संविधान जागृती समारंभ



खामगाव-  देशातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ५१ वर्षानंतर पहिल्यांदा आंबेडकरी समुहातील नेतृत्व विराजमान झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच दबल्या - कुचल्या या उपेक्षित समूहाला न्याय मिळेल. आंबेडकरी विचारधारा कवेत घेऊन वाटचाल करणारे खरगे साहेबांच्या निवडीमुळे निश्चितच देशात नव चैतन्य निर्माण होईल. त्यांच्या या निवडीमुळे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (अनुसूचित जाती) राजेश लिलोठियाजी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांचे सूचनेनुसार खामगाव येथे आयु. मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन खामगाव तालुका काँग्रेस  कमिटी अनुसूचित जाती विभागाचे वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २९  आक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता खामगाव जवळील श्रीधर महाराज सभागृह चोपडे यांचा मळा, घाटपुरी बायपास येथे होणार आहे. यानिमित्ताने भारत जोडो यात्रा व संवैधानिक मुल्यांची जपणूक करण्याची आवश्यकता यावर विशेष वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे . या कार्यक्रमात भारत जोडो दौर्याची पाहणी करण्यासाठी सध्या राज्यभर गस्त घालणारे महत्वाचे वरिष्ठ नेते यांचे आकर्षण असणार आहे . प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख मार्गदर्शन व देखरेखीखाली हा कार्यक्रम होत आहे.  या कार्यक्रमाचे संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे  नवनियुक्त सचिव गौतम गवई  आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून  बुलडाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे ,  महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश  सचिव धनंजय देशमुख ,बुलढाणा जिल्हा काँग्रेस  सेवादलचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण, बुलढाणा जिल्हा काँग्रेस   कमिटी  अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल ,  भूमि मुक्ती मोर्चाचे संस्थापक व काँग्रेस पक्षाचे नेते भाई प्रदीप अंभोरे,   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे विभागिय संघटक अंबादास वानखडे, भाई बाबुराव सरदार  हे राहणार आहेत . तसेच भारतीय संविधानाची विसरत मांडणी करणारे  डॉ. किशोर वानखडे यांचे ही व्याख्यान होणार आहे. तरी आंबेडकरी समुहातील सर्व कार्यकर्ते ,संविधान प्रेमी जन व काँग्रेसचे कार्यकर्त्यानी  वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post