अरे देवा...बुलडाणा जिल्ह्यात दुसराही अपघात

 


खामगाव जनोपचार:- बुलडाणा बोथा येथे आज दुपारी अपघातात 2 जण ठार झाले असून आता रात्री 8 वाजताच्या सुमारास चिखली तालुक्यातील

केळवद फाट्यावर स्वीफ्ट डिझायर व ऑटोचा

अपघात झाला. यामध्ये ऑटोमधील दोघे गंभीर

जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

 गावकऱ्यांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे

दाखल केले असून दोंघाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते

बुलडाणा बोथा येथील घटनेला काहितासाच उलटले  तोच चिखली तालुक्यातील केळवद

फाट्यावर  कार व ऑटोची धडक

झाली. यामध्ये ऑटो पलटी झाल्याने त्यामधील

दोन युवक गंभीर जखमी झाले. त्या युवकांच्या

डोक्याला गंभीर मार लागल्याने ते

युवक बेशुध्द पडले होते, ग्रामस्थांनी

घटनास्थळावर धाव घेत त्यांना जिल्हा सामान्य

रुग्णलयात हलविण्यात आले.  वृत्त लिहेपर्येंत जखमींची ओळख

पटलेली नाही. तर घटनास्थळावरुन पळ

काढणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारचे टायर

फुलल्याने केळवदच्या काही अंतरावर बंद

अवस्थेत मिळून आली.


Post a Comment

Previous Post Next Post