जनोपचार(नितेश मानकर)
खामगाव :-
अनाठायी खर्च करून वाढदिवस साजरा करताना आपण बरेचदा पाहतो मात्र समाजातील मुक्या जनावरांप्रति असलेली आस्था आज खामगाव येथील गं भा शकुंतलादेवी नामदेवरव इंगळे यांच्या वाढदिवशी पाहायला मिळाली
सुटाळपुरा भागात राहणाऱ्या शकुंतला माई चा आज 77 वा वाढदिवस! साध जीवन जगत शकुंतला देवीने नऊ मुलांचं सांगोपन केलं .आज इंगळे कुटुंब व्यावसायत खामगावात नंबर वन आहे .सर्वात मोठा रामदास व त्या पाठोपाठ राजेंद्र,गुलाब,निलेश,संजय,विजय,नितीन हे त्यांची मुलं तर सौ मीरा ठाकरे व सौ रेखा डिवरे ह्या मुली! नातवंडांची तर आज्जी लाडकीच! या सर्व मुलं मुली, सुना व नातवंडांनी 77 वा वाढदिवस परोपकारातून करण्याचे ठरवले! व मुक्या जनावरांसाठी चाऱ्याच्या रुपात धान्य देण्याचे ठरले.आज शकुंतलादेवी च्या वाढदिवशी लाडुतुला नव्हे तर गूळ, हरबरा डाळ,व ढेप तुला करण्यात आली आणि हे सर्व गोरक्षणात देण्यात आले. आजीने देखील या उपक्रमाचे कौतुक केले व नकळत त्यांचे सुखदाश्रू निघाले.
जनोपचार कडून मातोश्री ला शुभेच्छा
Post a Comment