गरीब गरजू निराधार कुटुंबाना साहित्य वाटपाने केली दिवाळी साजरी.
सेवा बहुउद्देशीय संस्था व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम.
पातूर(रक्षण देशमुख)-
दिवाळी आनंदोत्सव सर्वांच्या घरामध्ये साजरा होईलच हे सांगता येत नाही. कारण आर्थिक अभावी अनेक गरीब, प्लास्टिक कागदी पालावर वस्ती करणारे, तसेच निराधार ज्यांचा पती,मुलांचा आधार हरवलेला आहे.यांचा कसा साजरा होणार दिवाळी आनंदोत्सव?परंतु अशा लोकांना सुध्दा इतरां प्रमाणे सदर आनंदोत्सव साजरा करावासा वाटतो.त्यांच्या अंतर्ममनातील आवाजाला साथ देत अशा गरजू गरीब लोकांना दिवाळी सणामध्ये नवीन कपडे,गोडधोड पदार्थ मिळून त्यांना सणाचा आनंद घेता यावा या अनुषंगाने आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर,रुग्णसेवक,सतत सामाजिक कार्यामध्ये रुची असलेले रक्षण देशमुख,तसेच रुग्णसेवक मंगेशभाऊ केनेकर आणि त्यांच्या या कार्याला गावातील व बाहेर गावातील अनेक दान कर्त्यांनी आर्थिक व श्रमदान कर्त्यानी हातभार देत गरीब गरजू मंडळींना कापड,गोड धोड पदार्थांच्या साहित्याचे वितरण करून दिवाळी आनंदोत्सव पार पाडला.तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करून मोठे कार्य केले.चरनगाव येथील संतोष पारधी यांचा कॅन्सरनी मृत्यू झाला कर्ता पुरुष निघून गेला त्यांना आर्थिक मदत करून वरवड ता जि बुलढाणा येथे दिव्य सेवा प्रकल्प येथे बेघर मनोरुग्ण यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली.या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांच्या कार्याची जनतेसह पत्रकार मंडळींनी कौतुक केले.त्यांना या कार्यासाठी सुभाषजी जैन,अमर मोहोड अमरावती,श्रीधर लाड, मुकिंदा काळदाते,रोशन बाफना, गोविंद करपे ,नवनाथ पवार, दिगंबर महल्ले,गोपाल महल्ले,शिवम मुळे,करण देशमुख ,अभिषेक कठोळे,राजेश गोयल,शुभम महापुरे,संतोष गिरहे,गजानन चिकटे, दिपक साळवे आदींची मदत लाभली.
Post a Comment