मुंबई- गोवा मार्ग बंद करण्याचा इशारा

 संपादक नितेश मानकर जनोपचार


गडब/अवंतिका म्हात्रे


महाराष्ट्रातील एकमेव असा रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १२ वर्षांपासून संथगतीने सुरू असून सध्यस्थितीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात घडून नाहक बळी जात आहेत. त्यामुळे हा महामार्ग वापरण्यायोग्य नसल्याचे हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप ते रामवाडी या बंदिस्त पुलामुळे पेणचे अस्तित्व मिटत असल्याने मुंबई - गोवा महामार्गाचे योग्य प्रकारे काम व्हावे याकरिता १६ ऑक्टोबर रोजी माझं पेण संघर्ष समितीकडून बंद करण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे समितीचे राजेंद्र पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी अनेकदा सामाजिक राजकीय

संघटनांनी आंदोलने केली, मात्र याकडे सरकारासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील हा एकमेव महामार्ग रखडलेल्या अवस्थेत राहिला आहे. १२ वर्षे पूर्ण होत आली तरीही पलस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा पूर्ण होत नाही. या रस्त्यात आजही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था आहे एकीकडे धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तर खड्यांमुळे शेकडो खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था

आहे. एकीकडे धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तर खड्ड्यांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण जाऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर स्त्रिया या सर्वांना प्रवास करणे नकोसे झाले आहे. त्यामुळे शासन जोपर्यंत या महामार्गाची दुरवस्था दूर करत नाही तोपर्यंत माझं पेण या समितीमार्फत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post