खोटारडा पोलीस: असली बनला उल्लू ? नकली ने पळवली पिस्तूल

 खामगाव जनोपचार डेस्क: 


बुलडाणा येथे राजेश व्ही सरपोतदार नावाच्या नकली पोलीस उपनिरीक्षकाने जिल्हा पोलीस दलाला चांगलेच

उल्लू बनवले. पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत

बुलडाणा येथील पोलिसांच्या शस्त्रगारातून त्याने

पिस्टल आणि राऊंड मिळवले. मात्र नंतर ते त्याने

जमा केलेच नाहीत, दरम्यान चौकशी अंती जिल्ह्यात राजेश व्ही सरपोतदार नावाचा कोणताही

पोलीस उपनिरीक्षक नसल्याचे समोर आले. त्यामुळे कुण्यातरी भामट्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या बनावट सहीचे पत्र देऊन जिल्हा मुख्यालयातील शस्त्रगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उल्लू बनवल्याचे समोर आले आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात

याप्रकरणी नकली पीएसआय राजेश व्ही सरपोतदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना एप्रिल

२०१४ ची आहे. त्यावेळी देशभरात लोकसभा निवडणुका

सुरू होत्या. त्याचे झाले असे की, २८ एप्रिल २०१४ ला

राजेश व्ही सरपोतदार नावाच्या स्वत:ला शिवाजीनगर

पोलीस स्टेशन मध्ये उपनिरीक्षक असल्याचे सांगणाऱ्या

भामट्याने पिस्टल मिळविण्यासाठी अर्ज केला, तो बनावट

अर्ज व त्यावर तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांनी शस्त्र

देण्याचा आदेश दिल्याचा बनावट कागद त्याने शस्त्रगार

कार्यालयातील नेमणुकीवर असलेल्या पोलीस

कर्मचाऱ्याला दाखवला. त्यावरून त्याला पिस्टल व राऊंड

देण्यात आले.


मात्र त्यानंतर त्याने पिस्टल व राऊंड शस्त्रगार विभागात

जमा न केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विचारणा

केली असता, सरपोतदार नावाचा कुणी अधिकारीच

आपल्या पोलीस ठाण्यात नसल्याचे सांगण्यात आले. या

प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश

दिले होते.

अधिक चौकशीत जिल्ह्यातही राजेश सरपोतदार नावाचा

पोलीस उपनिरीक्षक नसल्याचे समोर आले. दरम्यान

तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांनी अर्जावर केलेली सही

त्यांची सही बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस

उपनिरीक्षक असल्याचे सांगत राजेश व्ही सरपोतदार याने

पोलीस विभागाला उल्लू बनवल्याचे समोर आले. अखेर

१२ ऑक्टोबर २०२२ रोजी गिरीश ताथोड यांच्या

तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात राजेश व्ही

सरपोतदार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

            साभार बुलडाणा लाईव्ह

Post a Comment

Previous Post Next Post