*वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे आ. अँड. फुंडकरांनी केले सांत्वन, दुसऱ्याच दिवशी दिला 4 लाख मदतीचा धनादेश
खामगाव::-* वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या पळशी बु येथील शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करीत त्यांना तात्काळ चार लाख रुपयांचा शासन मदतीचा धनादेश भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी प्रदान केला. खामगाव तालुक्यातील पळशी बु येथील शेतकरी मोहन श्रीराम सांगोकार हे आपल्या हिंगणा पळशी शिवारात असलेल्या शेतात 11 ऑक्टोबर रोजी शेत कामासाठी गेले होते. दरम्यान जोरात विजेच्या कडकडाटात पासून सुरू झाल्याने ते कुठे आश्रय घेण्याचा प्रयन्त करीत असतानाच त्यांचे अंगावर वीज कोसळली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुःखद बातमी कळताच आ अँड फुंडकर यांनी तातडीने पंचनामा करून शासन मदत देण्याचे आदेश तहसीलदार खामगाव यांना दिले. दुसऱ्याच दिवशी 12 ऑक्टोबर रोजी आ अँड फुंडकरांनी पळशी बु येथे जाऊन सांगोकार परिवाराचे सांत्वन केले. तसेच त्यांचे परिवाराला शासन मदत म्हणून तात्काळ 4 लक्ष रुपयाचा धनादेश प्रदान केला. यावेळी तहसीलदार पाटोळे, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, डॉ एकनाथ पाटील, विष्णुपंत लोखंडे, गणेश चिंचोळकर, मंडळ अधिकारी श्री सातपुते, तलाठी श्री राठोड, ग्रामसेवक श्री कांबळे, गणेश धानोकार, देवलाल वरोकार, कोतवाल अनिल चिंचोळकर, व पळशी बु ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment