![]() |
जाहिरात |
सकल मातंग समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची जयंती साजरी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : सकल मातंग समाजातर्फे खामगाव येथे दिनांक 7 मे 2025 रोजी मातंग समाजाचे हृदय सम्राट अनुसूचित जाती अ.ब.क.ड आरक्षणाचे जनक स्व. डॉ. बाबासाहेब गोपले यांची जयंती खामगाव येथे साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे नेते वामनराव बोरसे होते .
प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नेते संताराम तायडे , युवा नेते संजय बोदडे , जी. टी. जाधव सर , यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी दिनांक 20 मे 2025 रोजी मुंबई आझाद मैदान येथे होणाऱ्या सकल मातंग समाज जन आक्रोश महा आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचा निर्धार वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आणि गावागावात वस्तीमध्ये जाऊन सदर महाआंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता समाजाला प्रवृत्त करण्याचा संकल्प करण्यात आला सदर बैठकीचे सूत्रसंचालन कृष्णा नाटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मस्के सर यांनी केले याप्रसंगी गजानन सोनवणे शंकरजी वाघ सुनील वानखडे हरीश सावळे गजानन बोरसे व जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव खामगाव या तालुक्यातील सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते*
Post a Comment