एकनिष्ठा फाउंडेशन खामगांव महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 ने सम्मानीत
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव मधील एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशननी आपल्या सामाजिक कार्यानी आपली एक वेगळी ओळख गौ -सेवा रक्तदान क्षेत्रात निर्माण केलेली आहे. या सेवा कार्याची दखल सुद्धा घेऊन देवभूमी उत्तर प्रदेश येथे एकनिष्ठा फाउंडेशनला आंतरराष्ट्रीय पुरस्कार सम्मान मिळाला. उत्तर प्रदेश मधील सोनभद्र जिल्ह्यातील दुद्धीनगर येथील नगर परिषद मधील मोठ्या मैदानात द्वितीय अंतरराष्ट्रीय रक्तवीर सम्मान समारोह उत्साहाचे आयोजन प्रगती फाउंडेशन संस्थापक विकास अग्रहरि यांच्या टीम तर्फे दिनांक 4 में 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले होते.
![]() |
जाहिरात |
सर्व प्रथम रक्तदान जनजागृती रैलीत डी जे लावून देशभक्ती गीत वाजवत रक्त विरांनी रक्तदान महादान पोस्टर हाती घेत घोषणा देत डी जेच्या तालावर नाचत काढण्यात आली. या रैली मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यसह देश विदेशातील रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रमाला प्रथम दिप प्रज्वलन करू सुरवात झाली. महा रक्तदान शिबिराला आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकनिष्ठा रक्तनायक शुभम शमी , रक्तविरांगना सौ. मनिषा तिरणकर यवतमाळ , रक्तसम्राट अभय तेलतुंबडे शिर्डी यांनी रक्तदान करून केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार भुपेशजी चौबे सोनभद्र , श्रवणसिंह गोंड , कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलेश मोहन यांच्या हस्ते एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा खामगांव संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव , शिवा वनारे , शुभम शमी , सौ. मनिषा तिरणकर , यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्र गोल्ड मेडल ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
Post a Comment