जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन साजरा

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: आज दिनांक १ मे २०२५ रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्युनिअर अँड सिनिअर कॉलेज आवार येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच शाळेचा वार्षिक निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा श्री रामकृष्ण गुंजकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीत गाऊन  मानवंदना देण्यात आली.यावेळी संस्थेच्या सचिवा प्रा सौ सुरेखा ताई गुंजकर, कॉलेजचे प्राचार्य प्रा सतीश रायबोले सर ,शाळेचे मुख्याध्यापक संतोष अल्हाट यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याने  देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटलेला आहे .तसेच देशाची आर्थिक राजधानी ही आपल्या च राज्यात असून ती एक गर्वाची बाब आहे, असे प्रा रामकृष्ण गुंजकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.कार्यक्रमात यावेळी शिक्षणाचे महत्व व अभासाप्रती आवड निर्माण करणे जिद्द व चिकाटी या बद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

तसेच सायन्स ऑलंपियाड म्याथ,सायन्स, इंग्लिश,आणि जनरल नॉलेज परीक्षेमध्ये भरपूर मुलांनी गोल्ड मेडल पटकवले व स्कॉलरशिप परीक्षे मध्ये इयता पाचवी व आठवी यामध्ये आठवीचे विद्यार्थी वेदान्त चोपडे व सृष्टी मारके यांनी घवघवीत यश मिळवले तसेच मिशन एमपीएससी,  यूपीएससी या स्पर्धा परीक्षेत सुद्धा अत्यंत उस्पूर्थपने सहभाग घेऊन यश संपादन केले व तसेच गुणवंत विद्यार्थी  विद्यार्थिनीचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ज्योती मोरे मॅडम  आणि कार्यक्रमाची प्रस्तावना कुणाल सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  पाटील सर यांनी केले.


सर्व विद्यार्थी , पालक ,व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षत्तर सहकारी यांनी अत्यंत उस्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Post a Comment

Previous Post Next Post