सानंदांच्या "त्या" फलकामुळे मतदार संघात पुन्हा चर्चेला उधाण
सानंदा का "हात" किसके साथ?? ची शहरात चर्चा
ज़िंदगी में कब क्या हो जाये कोई नहीं कह सकता.. इसलिए कभी बेपरवाह हो कर मत बैठो, हर पल तैयार रहो। चुनौती कहीं भी आ सकती है और अवसर कभी भी मिल सकता है..!!
राजकीय समिकरण केव्हाही बदलू शकते याचे अनुभव अनेकवेळा राजकीय मंडळींना व सामान्य कार्यकर्त्यांनाही येतात. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार सानंदा हे काँग्रेसपासून दूर झाले आहे. असे बोलल्या जात होते. कारण अनेकवेळा त्यांनी लावलेल्या बॅनरवर त्यांचाच फोटो दिसत होता. वास्तविक पाहता सानंदांचे बॅनर अन् काँग्रेस नेत्यांचे फोटो नाहीत असे कधीही झाले नाही. मात्र मधल्या काळात हे सर्व थांबले. आता त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात लावण्यात आले. या बॅनरमधील काही बॅनरवर सानंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व याच बॅनरवर वरच्या बाजुला महापुरुषांचे व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मकरंद पाटील अशा महायुतीच्या नेत्यांचे फोटो पहिल्यांदा सानंदांच्या बॅनरवर झळकले त्यामुळे सानंदा पुन्हा मतदार संघात चर्चेत आले.
Post a Comment