अभाविप खामगांव तर्फे आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबीर दिशा २०२५ सुरू

खामगांव -जनोपचार न्यूज नेटवर्क; - स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा खामगांव च्या वतीने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबीर दिशा २०२५ चे उद्घाटन टिळक स्मारक मंदिर खामगांव येथे संपन्न झाले उद्घाटना साठी मंचावर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष तालुका संघचालक संतोष देशमुख, उद्घाटक विद्याताई कावडकर,  प्रमुख अतिथी माजी जिल्हा संघचालक तथा खामगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव महादेवराव भोजने,शाखा अध्यक्ष चंद्रकांत मेंडोले, नगरमंत्री गणेश कठाळे यांची उपस्थिती होती यावेळी  महादेवराव भोजने यांनी युवकांनी या व्यक्तिमत्त्व विकास शिबीरातुन आपल्या व्यक्तीमत्त्वाला एक निश्चित दिशा घेऊन जावे तसेच या भारतमातेच्या सेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले पाहिजे अशी भावनिक साद त्यांनी  शिबिरार्थ्यांना घातली.


उद्घाटक अभाविप च्या माजी अध्यक्ष तथा टिळक स्मारक मंदिर च्या सर्वेसर्वा विद्याताई कावडकर यांनी अभाविप खामगांव दरवर्षी या शिबीराचे आयोजन करुन सामान्य विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करते या बद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी सुध्दा याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.आज विनोद डिडवानीया यांचे व्यक्तिमत्त्व विकास व संकल्पना, मलकापूर येथील प्रसिद्ध वक्ते केशव  किन्होळकर यांचे नेतृत्व विकास, डॉ अशोक पडघान यांचे १० वी,१२ वी नंतर काय तसेच  स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.तसेच समाजातील प्रत्येक घटकाची माहिती व्हावी याकरिता आव्हान २०२५ हे सत्र घेण्यात येईल.



सदर उद्घाटन सत्राचे संचालन सविता अंभोरे प्रास्ताविक शाखा अध्यक्ष प्रा चंद्रकांत मेंडोले, परिचय गणेश कठाळे तर आभार शाखा उपाध्यक्ष अस्मिता भोजने यांनी मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post