खामगावच्या डीबी पथकाची भरदस्त कारवाई 

24 तासाच्या आत केले चोरट्याला जेरबंद: मुद्देमाल ही जप्त 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-मोताळा तालुक्यातील जयपुर कोथळी येथील प्रवासी बस मध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील नगदी 47 हजाराची रक्कम चोरट्याने लंपास केले 

जाहिरात

काल स्थानिक बस स्थानकावर घडली असून शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने 24 तासाच्या आत चोरट्याचा छळा लावत त्याला जेरबंद केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने चोरलेल्या रक्कम मधून 46 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले. 

मिळालेल्या माहितीनुसार कोथळी येथील शेतकरी वासुदेव कुलकर्णी हे काल दुपारी आपले काम आटपून गावी जाण्याकरिता खामगाव बस स्थानकावर आले. सुमारे चार वाजता च्या आसपास ते बस मध्ये चढत असताना आरोपी हमीद खान इसाखान वय 72 राहणार नांदुरा याने त्यांच्या खिशातील 47 हजाराची रक्कम गायब केली. घटना लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी शहर गोष्टीत तक्रार दिली. ठाणेदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख एपीआय भागवत मुळीक व त्यांच्या टीमने सूत्र हलवले आणि 24 तासाच्या आत चोरट्याचा शोध लावत त्याला जेrबंद केले. शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post