घरगुती गॅसची अवैध विक्री 

डीपी पथकाचा छापा :मुद्देमालासह एकला अटक


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: घरगुती वापरातील गॅस कॉम्प्रेसर च्या साह्याने अवैधरित्या विक्री होत असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने आज दुपारी छापा टाकला. यात गॅस सिलेंडर मशीन सह 21 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस सत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी हॉस्पिटल समोरील सोसायटीच्या गोडाऊनमध्ये शेख इमरान शेख हरून वय 30 वर्ष रा. सजनपुरी हा घरगुती वापरातील एलपीजी गॅस कॉम्प्रेसर मशीनच्या सहाय्याने विनापरवाना अवैधरित्या विक्री करत असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख एपीआय भागवत मुळीक, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप मोठे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोल्हे पोलीस कॉन्स्टबल अंकुश गुरुदेव, पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर आदींनी छापा यामध्ये तीन गॅस सिलेंडर, एक इलेक्ट्रिक वजन काटा, एक स्प्रेयर मोटर पंप असा एकूण 21000/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. सर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post