नायब तहसीलदार निखिल पाटील यांना राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
फोटो-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना नायब तहसीलदार निखिल पाटील खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे २१ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी खामगावचे नायब तहसीलदार निखिल पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२४-२०२५ वर्षाच्या स्पर्धेच्या निकालात खामगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार निखिल पाटील यांना राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्यासाठी, तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा राबविण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट उपक्रम अंतर्गत शासकीय अधिकारी श्रेणीमध्ये मध्ये नायब तहसीलदार निखिल राजू पाटील हे गडचिरोली जिल्ह्यातील तहसील कार्यालय कुरखेडा येथे कार्यरत असताना त्यांनी तहसील कार्यालयाचे मोबाईल ॲप सुरू करून या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन सेवांची माहिती एकाच ॲप द्वारे पुरविण्याची सेवा उपलब्ध करून दिली होती. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोकृष्ट उपक्रम या वर्गवारीत राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले. यामध्ये नायब तहसीलदार निखिल पाटील यांना द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. पारितोषिक वितरण मुख्यमंत्री यांचे हस्ते मुंबई येथे नागरी सेवा दिन २१ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
Post a Comment