लांजुड फाट्याजवळ 38 लाखाचा गुटखा जप्त: जळंब पोलिसांची कारवाई: तिघांना अटक
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: नांदू राहून खामगाव कडे प्रतिबंधित गुटखा येत असल्याची गुप्त माहिती मिळताच जलम पोलिसांनी लांजुड फाट्याजवळ वाहन पकडले . या वाहनात लाखो रुपये किमतीचा अवैध गुटखा मिळून आला. ही कारवाई जलम पोलिसांनी केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदूरा येथून खामगांवकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एक टाटा अल्ट्रा कंपनीचे मालवाहू वाहन क्र.MH-09-F-9994 यामध्ये काही ईसम हे शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पदार्थ बाळगून त्याची चोरटी वाहतूक करीत होते. दरम्यान गोपनीय माहितीवरून सपोनि. अमोल सांगळे व पोलीस स्टाफ यांनी नांदूरा ते खामगांव हायवेवर लांजूड फाटा नजीक नाकाबंदी केली असता, माहिती प्रमाणे टाटा अल्ट्रा कंपनीचे मालवाहू वाहन क्र.MH-09-F-9994 हे मिळून आले. सदर वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सम सुगंधीत पान मसाला मुद्देमाल मिळून आला.
असे आहे आरोपीचे नांव
1) समीर अमीर खान वय 34 वर्षे रा. चंदननगर, इंदौर ता.जि. इंदौर (मध्यप्रदेश)
2) गोवर्धन मायाराम सेन वय 32 वर्षे रा. सोडन ता. घटीया जि. उज्जैन (म.प्र.)
3) हरीकिसन राधेश्याम पांचाल वय 33 वर्षे रा. आक्यानजिक, ग्राम मालीखेडी उज्जैन (म.प्र.) (अटकदि.-10.04.2025)
आरोपीच्या ताब्यातून हा मुद्देमाल केला हस्तगत
1) शासन प्रतिबंधीत सुगंधीत विमल पान मसाला व गुटखा किं. 23,68,080/-रु.
2) टाटा अल्ट्रा कंपनीचे मालवाहू वाहन क्र.MH-09-F-9994 किं. 15,00,000/-रु.,एकूण- 38,68,080/-रु.चा मुद्देमाल.
ह्या गुन्ह्याची करण्यात आली नोंद
सदर प्रकरणी, श्री. गुलाबसिंग वसावे (अन्न सुरक्षा अधिकारी) अन्न व औषध प्रशासन बुलढाणा यांचे तक्रारीवरुन वरील तीन आरोपी यांचे विरुध्द पोलीस स्टेशन जलंब येथे भारतीय न्याय संहिताचे कलम 223, 274,275,123 सह अन्न व सुरक्षा कायदा-2006 चे कलम 26 (2) (i), 26(2) (ii), 27(3)(d),27(3)(e), 3(1)(zz) (iv), 59 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील ईतर आरोर्षीचा शोध घेण्यात येतअसुन पुढील तपास सपोनि, अमोल सांगळे यांच्या नेतृत्वात पो.स्टे. जलंब करीत आहेत.
यांनी केली कामगिरी
सदरची कामगिरी मा.श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. श्रेणिक लोढा-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी खामगांव यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सपोनि, अमोल सांगळे- ठाणेदार पो.स्टे. जलंब, पोउपनि. सुनिल देव, पोहेकों, गोविंदा होनमने, सचिन बावणे, पोकों, संदिप गावंडे, मपोकों. शेख अंजुम चालक पोकों. रितेश मसने सर्व नेमणूक पोस्टे. जलंब तसेच श्री. गुलाबसिंग वसावे (अन्न सुरक्षा अधिकारी) अन्न व औषध प्रशासन बुलढाणा यांनी केली आहे.
Post a Comment