शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे दोन ठिकाणी छापे: बारा हजाराची दारू जप्त
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: स्थानिक शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीपी पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून 11 975 रुपयाची दारू जप्त केली. स्थानिक चौकशी लेआउट व महाकाल चौक अशा दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये महेंद्र व नितीन मारुती सोनवणे या दोघांकडून देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनखाली डी बि पथकाचे सपोनि पुरी ,पोहेका संदीप टाकसाळ देवेंद्र शेळके मी, पोका केशव झ्याटे , देविदास चव्हाण, मपोका पल्लवी बोर्डे यांनी केली.
Post a Comment