रोटरी क्लब खामगांवद्वारे आरोग्य जागरूकता विषयक कार्यक्रम संपन्न

           खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - रोटरी क्लब खामगांव आरोग्य जागरुकतेविषयी नेहमीच सजग असते आणि त्या अनुषंगाने नेहमी अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. असाच एक कार्यक्रम १५ मार्च रोजी स्थानिक अग्रसेन भवन येथे सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम प्रकल्पप्रमुख डॉ आशिष झुनझुनवाला यांच्या नेतृत्वात रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि श्री अग्रसेन भवन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. 

            या आरोग्य जागरूकता कार्यक्रमास कीनोट स्पिकर म्हणून मुंबई येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ व रेटीना विशेषज्ञ डॉ रोहित मोदी हे लाभले होते. त्यांनी “Holistic Health & Disease Reversal” या विषयावर उपस्थितांना पॉवर पॉइंटद्वारे अतिशय उपयुक्त मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि डॉ मोदी यांचा परिचय प्रकल्पप्रमुख डॉ आशिष झुनझुनवाला यांनी उपस्थितांना करून दिला. 

            आपल्या वैद्यकीय संबोधनात त्यांनी सर्वशक्तिमान निसर्गाच्या नियमांनुसार आपले मन आणि आहार कसे प्रोग्राम करता येतील जेणेकरून निसर्गात उपलब्ध असलेल्या फळभाज्यांचा किंवा मसाल्यांचा वापर करून प्रकृतीमान सुधारता येणे शक्य होईल आणि निरोगी दीर्घायुष्य जगता येईल. शाश्वत आरोग्य आणि आनंद अनुभवण्यासाठी निसर्ग हा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि हेच यांचे मूळ गमक आहे हे त्यांनी आपल्या संबोधनात सप्रमाण सिद्ध केले. अतिशय सोप्या आणि सरल भाषेतील व व्यवहारातील अनेक उदाहरणे असलेले त्यांचे सादरीकरण असल्यामुळे प्रेक्षक वर्ग आपल्या जागी शेवटपर्यंत खिळून राहिला. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. 

            या कार्यक्रमाचे संचालन डॉ गौरव गोएनका यांनी केले तर सहायक म्हणून विक्रम तिवारी आणि सुशांतराज घवाळकर यांनी कार्य पाहिले. रोटरी क्लबतर्फे क्लब अध्यक्ष विजय पटेल आणि मानद सचिव किशन मोहता यांनी डॉ रोहित मोदी यांना मानचिन्ह प्रदान करून सन्मानित केले. कार्यक्रमाला साजेसे आभार प्रदर्शन सौ पिंकी झुनझुनवाला यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी असणारा “हाय-टी” हा विविध फळ-फळावळांचा असल्यामुळे परत एकदा रोटरीबाबत “बोले तैसा चाले” याची प्रचिती आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम केले.

            या कार्यक्रमात आरोग्याविषयक जागरूकता असलेल्या शहरातील सुमारे १५० गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. लोकांना आरोग्य जागरुकतेविषयी सजग करणारा आणि ओघवते सादरीकरण असल्यामुळे खामगांवच्या जनतेस “एकंदरीत हा कार्यक्रम आवडला” अशा त्यांच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post