वास्तविक दिव्यांगावर अन्याय करणाऱ्या सेतू केंद्र चालकावर दिव्यांगा सुरक्षा कायद्यासह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
खामगांव जनोपचार नेटवर्क :- बोगस अपंग प्रमाणपत्र तसेच त्यावर खोडतोड करणाऱ्या ऑनलाइन केंद्र चालकावर दिव्यांग सुरक्षा हमी कायदा तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवा संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या वतीने देण्यात आले
बुलढाणा जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यात बोगस अपंग प्रमाणपत्रांचा तसेच यु डी आय डी कार्डचा सुळसुळाट वाढलेला आहे या प्रमाणपत्र व यु डी आय डी कार्ड च्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ या माध्यमातून मिळत असतो या प्रमाणपत्र व यु डी आय डी कार्ड बनविणारे रॅकेट सध्या आपल्या जिल्ह्यात कार्यरत आहे त्याचाच प्रत्यय दिनांक 19/03/2025 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव येथे उघडकीस आल्यानंतर शहर पोलीस स्टेशन खामगाव येथे गुन्हा क्र. ११७/२०२५ कलम ४२०,४६५४६८,४७१,४७२ भारतीय दंड विधान नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदर प्रकरणांमध्ये संबंधित प्रकरणात यातील मुख्य सूत्रधार खामगाव सह बुलढाणा व इतर तालुक्यात ऑनलाइन सेंटर चालवणारे आहेत याविषयीच्या अनेक बातम्या विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आहे तरी या प्रकरणामध्ये सी आय डी चौकशी करून यातील मुख्य सूत्रधार व हे काम करणारे आपल्या जिल्ह्यातील विविध ऑनलाइन सेंटर चालक या मध्ये गुंतलेले आहेत खामगाव येथील प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार दिसून येत आहे, अश्या दलाल यांचा पर्दाफाश करीत दिव्यांग सुरक्षा कायदा व देश द्रोहाचा या चौकशीतून गुन्हा दाखल करण्यात यावा प्रमाणपत्र कुठे तयार केले, त्याला कोणी मदत केली , प्रमाणपत्र बोगस देणाऱ्याने किती प्रमाणपत्र बनून कोणा कोणा ला दिली, किती आर्थिक व्यवहार झाला , लाभार्थी ने बनावट प्रमाणपत्र बनून घेऊन कोणते लाभ घेतले, बनावट शिक्के कुठून उपलब्ध केले याची चौकशी करण्यात यावी करिता अशा मागणीचे निवेदन सादर केले आहे यावर आपण पंधरा दिवसात कठोरात कठोर कार्यवाही करावी, व्हावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागेल तसेच सोबत असलेल्या ची संपूर्ण सखोल चौकशी या निवेदनाच्या प्रतिलिपी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस , मा. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलढाणा , मा. पालकमंत्री मकरंदजी पाटील बुलढाणा , मा. कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर खामगाव , जिल्हाधिकारी बुलढाणा , दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे. यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत हे निवेदन देते वेळी मनोज नगरनाईक सह पत्रकार पंकज गमे संतोष करे आकाश शिंदे,संतोष आटोळे आदी उपस्थित होते
Post a Comment