अंतरा इंजेक्शनचा शॉर्टेज..
बुलढाणा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
खामगाव :- पाळणा लांबविण्यासाठी अनेक पर्याय असताना अंतरा इंजेक्शनचाही आता वापर वाढला आहे. राज्य सरकारने 'अंतरा' हे गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी याचा प्रभावी वापर होऊ लागला आहे.मात्र जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे ह्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.शासकीय रुग्णालयात अंतरा मिळत नसल्याने अनेकांना खाजगीत इंजेक्शन घ्यावे लागत आहे.
एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो. पण आता 'अंतरा' इंजेक्शनसह 'कॉपर टी' बसवण्याच्या प्रमाणात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यातून नको असलेली गर्भधारणा टाळता येते व गर्भपाताचे प्रमाणही कमी होते.
'अंतरा' टोचा, तीन महिने बिनधास्त राहा
कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच सोपा आणि सुरक्ष पर्याय आहे. शस्त्रक्रिया न करता गर्भधारणा टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येते. हे इंजेक्शन घेतल्यानंतर महिलांना तीन महिने गर्भधारणेची चिंता राहत नाही. मात्र हे इंजेक्शन आव्हेलेबल नसल्याने आरोग्य विभागाच्या नियोजनाचे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
Post a Comment