लॉयन्स एक्सपो 2025 मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन
लॉयन्स क्लब खामगाव व शगून इवेंट्स नागपूर द्वारे आयोजित लॉयन्स एक्सपो 2025 मध्ये स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिनांक 6 मार्च ते 11 मार्च 2025 दरम्यान जलंब रोड वरील पॉलिटेक्निक ग्राउंड वरहोत असलेल्या लॉयन्स एक्सपो मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
गुरुवार दिनांक 6 मार्च ते सोमवार 10 मार्च पर्यन्त रोज बच्चे कंपनी साठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा सायंकाळी 6 ते 8 दरम्यान आयोजित केली आहे ही स्पर्धा 12 वर्षापर्यंत व 12 वर्षावरील अशा दोन गटात राहील. तसेच 8 ते 10 वाजेपर्यंत बॉलीवूड फॅशन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात वयाची अट नाही ऐनवेळी ही एंट्री घेतली जाईल.
शुक्रवार 7 मार्च रोजी सुदृढ बालक स्पर्धा 3 ते 7 महीने आणि 8 ते 12 महीने या दोन गटात घेण्यात येईल. याच दिवशी फॅन्सि ड्रेस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून 12 वर्षाखालील व 12 वर्षावरील दोन गटात ही स्पर्धा होईल
शनिवार दि.8 मार्च रोजी एक्सपो चित्रकला स्पर्धा विविध गटांमध्ये घेण्यात येईल. त्यानंतर संगीत वादन (म्यूजिकल इन्स्ट्रुमेंट) स्पर्धा होईल संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान 12 वर्षाखालील स्पर्धकासाठी एकल अर्थात सोलो डान्स स्पर्धा होईल
रविवार 9 मार्च रोजी रील बनाओ स्पर्धा होईल .10 वर्षावरील 3 ते 5 सदस्य एक ग्रुप मध्ये राहतील रील व्यासपीठावर सादर करावी लागेल. त्यानंतर जोडी नं 1 अर्थात डुएट डान्स स्पर्धा होईल याच दिवशी 12 वर्षावरील स्पर्धकासाठी एकल (सोलो) डान्स स्पर्धा होईल
सोमवार दि 10 मार्च रोजी मिले सूर मेरा तुम्हारा या गायन स्पर्धेचे आयोजन केले असून याची थीम राहील भूत से भविष्य अर्थात फ्रॉम पास्ट टू द फ्युचर सोलो व डुएट . तसेच मंगळवारी फक्त लॉयन्स सदस्यासाठी फॅशन स्पर्धा राहील . वरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नाव नोंदणीसाठी व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लॉ अपर्णा बावस्कर 9423144987, लॉ फाल्गुनी शाह 8605785516,लॉ नेहा कमानी 9665367179, लॉ रितू बडजाते 9850959227, लॉ उर्मिला केला 9421468673, लॉ दीपिका परदेशी 7972007072, लॉ रश्मि भट्टड 8275837024 , लिओ गौरव खत्री 9411777757 , लिओ पीयूष आंबेकर 9823432532 व लिओ मयूर सोनोने 9766778937 यांचेशी संपर्क साधावा तसेच लॉयन्स एक्सपो बद्दल अधिक माहितीसाठी 9422180908,9922112877,9923144214 अथवा 9423721257 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे असे प्रसिद्धी प्रमुख लॉ डॉ परमेश्वर चव्हाण यांनी कळविले आहे
Post a Comment