हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज - महादेवराव भोजने 

खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क - स्थानिक माधवनगर स्थित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यालयात शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी जिल्हा संघचालक व खामगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव महादेवराव भोजने, जिल्हा प्रमुख गणेश घोराळे, जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे, जिल्हा संगठनमंत्री महेश वाघमारे, अभाविप नगर उपाध्यक्ष अस्मिता भोजने, पुर्व कार्यकर्ता सुचेता हातेकर,जयंतदादा कुळकर्णी,दिपकदादा ईंदोरीया, जिग्नेश कमानी,समाज सेवक संजय भोजने,नगर मंत्री गणेश कठाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी महादेवराव भोजने यांनी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी उदाहरणं देऊन शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या ईतिहास च कार्यकर्ता समोर मांडला. शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावून व ते आत्मसात करून आजच्या युवकांनी  आपल्या जीवनात मार्गक्रमण केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 यावेळी महादेवराव भोजने यांच्या हस्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या सुचना फलका चे उद्घाटन करण्यात आले.अभाविप च्या कामाच्या वाढी साठी समाजाने नुतन दुचाकी दिली.दुचाकी ची चाबी महादेवराव भोजने यांच्या हस्ते अभाविप ला प्रदान करण्यात आली.यावेळी शुभम राठोड,ओम काळे,हरिश राऊत, आनंद पाटील, सानिका राठोड, वैष्णवी जवळकार, जागृती नेमाने,सागर जुमळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post