खामगाव उप माहिती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:_ महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खामगाव येथील व माहिती कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी उप माहिती कार्यालयाचे अधिकारी अनिल महल्ले, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितेश मानकर, ग्रामक्रांती वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संभाजीराव टाले खामगाव प्रेस क्लबचे माजी सचिव अनिल खोडके, मराठी पत्रकार परिषदेचे खामगाव शहर अध्यक्ष गणेश पानझडे, अनिल भाऊ जाधव आदींची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजदूत चे संपादक अनिल खोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर बसलेली प्रतिमा उप माहिती कार्यालया ला छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट दिली.
Post a Comment