बहारदार गीतांच्या मैफिलीने कोल्हटकर नगरीत उत्साह
कराओके सिंगर्स क्लबला गायकांचा मोठा प्रतिसाद :प्रेक्षकांनी दिली भरभरून दाद!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- कराओके सिंगर्स क्लब खामगाव व शेगाव प्रस्तुत एक शाम संगीत के नाम चा बहादर कार्यक्रम 22 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हटकर स्मारक मंदिर येथे संपन्न झाला.गेल्या काही काळापासून खामगाव शहरातील हौशी रसिकांसाठी व श्रोत्यांसाठी खामगाव कराओके सिंगर्स क्लब अहोरात्र झटत आहे.
त्या अनुषंगाने एक शाम संगीत के नाम बहारदार कार्यक्रम कोल्हटकर स्मारक येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पार पडला. असंख्य गायकांनी आपले उत्कृष्ट गीते सादर केले .यामध्ये खामगावसह अमरावती, अकोला, शेगाव, जळगाव जामोद व बुलढाणा जिल्ह्यातील गायक आपली गीते सादर केली. एकाहून एक बहारदार गीत गायना ची पेशकश झाल्यामुळे श्रुती अगदी मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमांमध्ये मराठी सिने ऍक्टर श्री राजेश काळे यांनी सुद्धा प्रमुख उपस्थिती लावली .त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये अॅक्टींग केली आहे. त्यांचा सुद्धा कराओके सिंगर्स क्लब खामगाव च्या वतीने शाल श्रीफळ व हार देऊन त्यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला. कराओके सिंगर्स क्लब खामगावच्या या कामाबद्दल सर्वत्र त्यांचा कौतुक होत आहे.
Post a Comment