श्री विश्वकर्मा पुरस्कार 2025 ने कामगार मंत्री आकाश फुंडकर सन्मानीत तर समाजभुषण पुरस्काराने पत्रकार अनुप गवळींचा गौरव
सोमवंशी आर्य क्षत्रिय लोहार समाजाकडून विश्वकर्मा जयंतीनिमित्त अनेकांचा सत्कार
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त समस्त सोमवंशी आर्य क्षत्रिय लोहार, गाडीलोहार आणि जिनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांचा विश्वकर्मा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तसेच समाजासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दैनिक महाभुमिचे उपसंपादक अनुप गवळी यांना समाज भुषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
खामगाव शहरात मागील 15 वर्षामध्ये कोट्यवधींची विकास कामे करून शहर व परिसराचा कायापालट करीत विश्वकर्माची भुमिका निभावणारे राज्याचे कामगार मंत्री तथा खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांचा सोमवंशी आर्य क्षत्रिय लोहार समाजाकडून 10 फेब्रुवारी रोजी येथील पत्रकार भवन येथे गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ना. आकाश फुंडकर यांनी सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाने दिलेल्या विश्वकर्मा पुरस्काराने त्यांचेवरील सर्वच समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे. यापुढेही सर्व समाजाला सोबत घेवून त्यांच्या विकासासाठी झटत राहील. असे आश्वासन यावेळी त्यांनी आयोजित कार्यक्रमात दिले. यावेळी कार्यक्रमाला मंचावर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे ज्येष्ठ अध्यक्ष डिगांबर मानेकर, अनिल नगरे, शाम वाणे, योगेश उर्फ पिंटू जाधव, सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे युवा संघटन अध्यक्ष अनुप गवळी आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खंदारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार महेंद्र बनसोड यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी रजनिश चव्हाण, सुशांतराज घवाळकर, इंजिनिअर अंकित वानखेडे, सिध्दार्थ वानखेडे, सौरभ जाधव, श्याम वानखेडे, राजू मोरे यांच्यासह समाजातील युवा सदस्यांनी परिश्रम घेतले.
समाजातील इंजिनिअर आणि कुशल कारागीरांचा सत्कार
सौरभ अनिल वानखेडे इंजिनिअर, प्रियंका गणेश चव्हाण - इंजिनिअर, अंकित वानखेडे, डॉ. प्रियंका अनिल नगरे, सौरभ जाधव, सिध्दार्थ वानखेडे, यश प्रविण घवाळकर, प्रविण राजू शिंदे, वैभव गणेश नेमाडे, पियुष गणेश चव्हाण, विवेक कावरे, शिक्षिका सायली श्रृतीकर, अजिंक्य वानखेडे, भुषण श्रृतीकर तसेच समाजातील उत्कृष्ट व्यावसायीक म्हणून पिंटू जाधव, सुशांत गोधर्वध घवाळकर, महेंद्र गजानन बनसोड, अर्चना रजनीश चव्हाण तसेच उत्कृष्ट कारगीर म्हणून सुनिल सुरेश चव्हाण, सोमनाथ रघुनाथ चव्हाण, गणेश सुरेश चव्हाण, शरद वसंतराव नगरे, आकाश मानेकर, क्षितिजा मानेकर, कांबळे आदिंचा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला.
Post a Comment