दरोडा पडतोय रात्री आणि गृह विभाग असते झोपेत!
दरोडयामध्ये मध्ये डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू...!जिल्ह्यात एकच खळबळ..
मुंबईमध्ये अभिनेता सैफ अली खान यांच्या घरामध्ये मध्यरात्री चोरट्याने लुटून त्यांच्यावर केलेला जीवघेणा हल्ला व त्यानंतर दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेली घटना ताजीच असताना बुलढाण्यात देखील काल मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरामध्ये दरोडेखोर घुसून डॉक्टर पत्नीची हत्या झाल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे नेमकं आता मुंबईपासून गाव शहर खेडे किती सुरक्षित आहे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जीवघेणा दरोडा पडला आहे. लूट मारी करताना दरोडेखोरांनी एका महिलेचा जीव घेतला. दाभाडीच्या बस स्टँडजवळ दाताळा रोडवर पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी काल मध्यरात्री हा दरोडा पडला. त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे यांचा या दरोड्यामध्ये जीव गेला आहे. घरात पती-पत्नी दोघेच होते. दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सहली निमित्त बाहेर होती. सकाळी पाच वाजता सदर दरोडा पडल्याची घटना लक्षात आली. कारण डॉक्टर गजानन टेकाळे बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. तर त्यांच्या पत्नी सौ माधुरी टेकाळे गतप्राण झालेल्या होत्या. मृतक माधुरी टेकाळे यांचा चेहरा पूर्णपणे काळा पडलेला होता. दरोडेखोरांनी बेडरूम मध्ये असलेले कपाटे तोदून दागिने आणि कॅश चोरून नेले.
झटापटी दरम्यान दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा जीव घेतला असावा, असा संशय आहे. डॉक्टर गजानन टेकाळे अत्यवस्थ असून त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याही मेंदूवर मार बसल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी दाभाडी कडे प्रयाण केले आहे. सदर घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. द रोडा टाकून दरोडेखोर पसार झाले. आज सकाळी 5 वाजे दरम्यान जेव्हा टेकाळे यांचे नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा सदर प्रकार समोर आला.
*नागरिकांमध्ये आहे रोष*
गेल्या काही दिवसांत मोताळा तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी वाघजाळ येथे पडलेल्या दरोड्याचा अद्याप उलगडा झालेला नाही, तसेच मोताळा शहर आणि बोराखेडी परिसरात झालेल्या मोठ्या चोऱ्यांमध्येही पोलिसांना अद्याप यश मिळालेले नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी आहे. चोरट्यांचा शोध लावून नागरिकांना संरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Post a Comment