केसगळती रुग्णांना हॉस्पीटल ला तात्काळ भरती करून कोरोना 19 प्रमाणे विशेष औषधौपचार करून त्वरेने या रोगांवर प्रतिबंध घालावा - उ.बा.ठा शिवसेना  ऊर्मिलाताई ठाकरे यांची मागणी*

शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांच्या शेगाव तालुक्यातील गावांत केसगळती रुग्णांच्या सांत्वनपर भेटी

  

  *शेगांव*Janopchar news network-- *दि.१७-०१-२०२५ रोजी जिल्हा  संपर्क प्रमुख नरेंद्रभाऊ खेडेकर यांचे नेतृत्वात जिल्हा प्रमुख वसंत भोजने,उप जिल्हा प्रमुख* *अविनाश दळवी, शिवसेना नेत्या ऊर्मिलाताई ठाकरे, महिला आघाडी शैलेजा ठाकरे,तालुका प्रमुख हर्षल आखरे ,खामगाव तालुका प्रमुख श्रीराम खेलदार, आदि पदाधिकारी यांनी बुलढाणा  जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव,कालवड,कठोरा,* *मच्छिंद्रखेड,निंबी,माटरगाव...आदि गावांना  डोक्यावरील केस गळती झालेल्या रुग्णांच्या सांत्वन पर भेटी देवून व रुग्णांना धीर दिला.केस गळती मुळे गावातील नागरिक भयभीत झालेले असून, त्यांचे जीवनमान विस्कळीत झालेले आहे*अनेक लहान मुलांचे डोक्यावरचे केस गेल्यामुळे शाळेत जाणे बंद झाले आहे.शिक्षणापासून ते वंचित असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.*



            *रुग्ण संख्या वाढतच असल्याने सामाजिक दृष्ट्या या गावातील  नागरिकांना वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. लग्नाकरीता मुले/मुली* *पाहण्यासाठी दिलेल्या करारावर पाहूणे आले नाहीत, पिण्यायोग्य पाण्याची भीषण टंचाई असून पाण्याची उसनवारी केली जाते,असेही काही नागरिकांनी सांगितले.*


        *शासनाच्या भरपूर आरोग्य टिम येऊन गेल्या परंतु अद्यापही निदान झालेले नाही.राज्य शासनाचे व केंद्र सरकारचे पुर्णतः या रुग्णांकडे दुर्लक्ष आहे, सरकार पूर्णता अपयशी झाल्याचे दिसून येते. केसगळती कशामुळे झाले यांचे उत्तर शासन देऊ शकले* *नाही सरकारने WHO ला पाचारण करावे असे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर यांनी पत्रकारांना सांगितले.*

 


            *यावेळी केसगळती रुग्णांना घरी नाही तर  हॉस्पीटलला तात्काळ भरती करून कोरोना 19 प्रमाणे विशेष औषधौपचार करून त्वरेने या रोगावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी उ.बा.ठा शिवसेना  नेत्या ऊर्मिलाताई ठाकरे यांनी केली.केसगळती रुग्णांची संख्या 235 झाली असून रुग्ण संख्या वाढतच आहे,ही गंभीर व चिंताजनक बाब आहे. असे शिवसेना (उबाठा) पदाधिकार्यांच्या शेगाव तालुक्यातील  केसगळती रुग्णांच्या गावात सांत्वनपर भेटी प्रसंगी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

या प्रसंगी घाटाखालील तालुक्यातील पदाधिकारी सोबत होते.माजी तालुका प्रमुख दत्ताभाऊ पाटील तालुका प्रमुख प्रमुख हर्षल आखरे खामगाव ता प्रमुख मा श्रीराम खेलदार संग्रामपूर उप तालुका प्रमुख विजू भाऊ मारोडे व त्यांचे सर्व सहकारी तसेच महिला आघाडी शैलजाताई ठाकरे, कल्पना लाहुडकार, बाबा फंदाड, मोहन भेंडे , पंकज लोखंडे,श्री. बी.टी.म्हस्के व अनेक  शिवसैनिक उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post