दोन मुलांचा बाप असलेल्या  नराधमाने अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

खामगाव -  वासनेच्या आहारी गेलेली माणसे कधी काय आणि कुणासोबत काय करतील याचा नेम नाही. डोणगाव पोलीस ठाणे हद्दीत एका वासनांध नराधमाचा विकृत कारनामा समोर आला आहे. चक्क दोन मुलांचा बाप असलेल्या या नराधमाने अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला आहे.याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील राहणारा आहे. अमोल विजय लोखंडे असे आरोपीचे नाव असून  पीडित अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची आहे. त्याने ७ डिसेंबर रोजी लग्नाचे आमिष दाखवून सदर मुलीला पळून नेले होते. त्याने मुलीला नाशिक येथे नेले, तिथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला. दरम्यान इकडे मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे शोधूनही मुलगी न सापडल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात आधी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेण्यासाठी पथके निर्माण केली. दरम्यान पोलीस मागावर असल्याची माहिती आरोपी अमोल याला मिळाली. त्यामुळे तो लपून छपून राहत होता. अखेर ३१ डिसेंबरला तो स्वतःहून मुलीला घेऊन रिसोड तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. ही माहिती डोणगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिरपूर पोलिसांकडून अमोलला ताब्यात घेतले. यावेळी पीडित मुलीने आपल्या जबाबात आरोपी अमोलने लग्नाचे अमिषा दाखवून बलात्कार केल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी आधीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात बाललैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post