मोहम्मद रियाज आणि  अरविंद अंजनकर यांना सेवानिवृत्त निरोप 


खामगाव :- हिंदुस्तान युनिलिव्हरचे मोहम्मद रियाज अब्दुल गफ्फार यांना 31 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या सेवेची 24 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आणि अरविंद अंजनकर यांना सेवे 36 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यामुळे या निरोप समारंभात कारखान्याचे व्यवस्थापक सुरेंद्र ठाकूर, मोहम्मद रियाज, अरविंद अंजनकर मंचावर विराजमान होते याप्रसंगी कॉलिटी कंट्रोल मॅनेजर ब्रिजेश गुजराती , प्रोडक्शन मॅनेजर महक रैना , नीरज राय प्रीति वर्मा एचआर एग्जीक्यूटिव शुभम पवार प्रमुख जाने उपस्थित होते 



या वेळी  मुर्तिजा बोहरा , विजय बोराडे, नीरज राय, मोहम्मद आकिब, शुभम पवार आदींनी त्यांच्या मनोगतातून सेवा दिलेल्या अरविंद अंजनकर आणि  मोहम्मद रियाज यांनी हिंदुस्तानी च्या प्लांटमध्ये दिलेली उत्कृष्ट सर्विस बद्दल दोघांचे कौतुक केले यावेळी अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदुस्तान युनिलिव्हर सर्व अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आपल्या सर्विस मध्ये मिळालेल्या सहकार्याबद्दलआभार व्यक्त केले 

आपले मनोगत व्यक्त करताना फॅक्टरी इंजिनीयर सुरेंद्र ठाकूर यांनी अरविंद अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांच्या सेवेचे खूप कौतुक केले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये गेल्या 30 वर्षात प्रथमच महाराष्ट्राच्या नंबर वन बॉयलर हाऊसचा बहुमान मिळाल्याबद्दल बॉयलर हाऊस च्या सर्व स्टाफ चे कौतुक करून आठवण काढली  त्यानंतर अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांना निरोप समारंभात भेट वस्तू देण्यात आला.  यावेळी शुभम पवार यांनी अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांच्या कुटुंबीयांना सभागृहात मोकळ्या मनाने चर्चा करण्याची संधी दिली, यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. बहुतांश सदस्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतले आज याबद्दल मला अभिमान आहे यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांना हिंदुस्तान युनिलिव्हर चा  बॉयलर हाऊस आणि प्लांट पाहण्याची संधी मिळाली. खामगाव चा हा हिंदुस्तान युनिलिव्हरच्या प्लांट आशिया चा सर्वात मोठा प्लांट आहे खामगाव एमआयडीसी वसाहत मध्ये हा प्लांट 1985 साली सुरू करण्यात आला होता

Post a Comment

Previous Post Next Post