श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने भक्ती भावाने श्री दत्त जयंती साजरी
खामगाव स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दिं १४-१२-२०२४ शनिवार रोजी मंडळाचे एकनिष्ठ सदस्या स्व प्रमिला बाई देशमुख यांच्या घरी संध्याकाळी ६ वा श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २४ वर्षा पासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत संध्या ५ वा श्री सदगुरू एकनाथ महाराज व श्री दत्त भगवान .यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पुजन करण्यात आले त्यानंतर भजन. नामस्मरण. सदगुरू स्तोत्र चे पठण . महाआरती करून महाप्रसाद ( खिचडी ) वाटप करण्यात आले
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने,मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. दिलीप झापर्डे.किशोर अतकरे ,अरूण कडवकर,विनोद देशमुख,लालाजी सांगळे.बन्टी देशमुख, विक्की देशमुख,आशाताई अंधारे. मंगला बावस्कर.निताताई अंधारे , शकुंतला ढवळे.पार्वता सुकाळे. संगिता वाघोळे. शालिनी देशमुख,जयश्री झापर्डे.जया सुकाळे,गायत्री देशमुख,मानु शर्मा,व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते मंडळाच्या वतीने वृक्षारोपण.रक्तदान गोरगरीबांना भोजन वाटप.ब्लॅकेट वाटप. पक्ष्यांच्या करीता पाणी पात्र वाटप असे अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम वर्ष भर राबविल्या जातात अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली
Post a Comment