शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सभासद नोंदणीला सुरुवात
खामगाव (नितेश मानकर) जनोपचार न्यूज नेटवर्क :- 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्वाभिमानी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाच्या वतीने साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने दि 14 शनिवार रोजी खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाच्या वतीने नव्याने सभासद नोंदणीचा शुभारंभ शहराध्यक्ष विकास चव्हाण यांनी विनोद उर्फ बंटी शर्मा व्यापारी उद्योगी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस श प जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांचा पक्ष नोंदणी चा फॉर्म भरून पक्ष नोंदणी करण्यात आली असून शहरात सभासद नोंदणी ही सुरू झाली असून यापुढे आता रोजच पक्ष सभासद नोंदणी या शहरात होणार असल्याचे शहर अध्यक्ष विकास चव्हाण सांगितले तरी या वेळी पक्ष सभासद नोंदणी च्या शुभारंभ वेळी पक्षाचे जिल्हा संघटक संभाजीराव टाले तसेच शहर सचिव आकाश खारपाटे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते
Post a Comment