संतोष वाघमारे यांची इमानदारी...
यूपीआय वर आलेले पन्नास हजार केले परत!
![]() |
--- 98223 19565----- |
खामगाव (नितेश मानकर) :-सापडलेले दहा रुपयेही परत करण्याची मानसिकता ढासाळत जात असतानाच खामगाव येथील संतोष वाघमारे यांनी त्यांच्या यूपीआय वर आलेले 50 हजार रुपये परत करून इमानदारी कायम ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे.
संतोष त्रंबक वाघमारे हे येथील हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये कामगार आहेत. आज सकाळी 11 वाजता त्यांना पन्नास हजार रुपये यूपीआय द्वारे प्राप्त झाले. अचानक आलेल्या पैशाला पाहून त्यांचा इमान डगमगला नाही. उलट त्यांनी बजरंग बिडकर कोल्हापूर यांच्याशी भ्रमणध्वनीवर बातचीत केल्यानंतर हे पैसे त्यांना परत केले. संतोष वाघमारे यांनी दाखविलेल्या इमानदारी बद्दल जनोपचार कडून त्यांना मानाचा मुजरा.
Post a Comment