शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक
शेतकरी त्रस्त महावितरण चे कर्मचारी अधिकारी मस्त....
खामगाव जनोपचार :+ पूर्ण ग्रामीण मधील शेतीचे dp ट्रांसफार्मर नादुरुस्त व वरलोड असल्यामुळे शेतकरी पूर्ण संकटात सापडलेला आहे महावितरण अधिकारी कर्मचारी यांना वारंवार सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना सहकार्य करत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच आज भालेगाव बाजार व कुंभेफळ येथील शेतकरी यांनी उपविभागीय कार्यालय शेगाव रोड खामगाव येथे उपकार्यकारी अभियंता बाहेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले .
![]() |
Advt |
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की भालेगाव बाजार कुंभेफळ मध्ये असलेली शेतामधील वाडे डीपी नादुरुस्त असून वरलोड असल्यामुळे दिवसातून एक तास सुद्धा मोटरी चालत नाही कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा कोणी लक्ष द्यायला तयार नाही आम्हाला तिथे अतिरिक्त डीपी द्यावी किंवा 63 ठिकाणी 100 चा ट्रांसफार्मर देण्यात यावा असे निवेदन म्हटले आहे व हा एक भालेगाव बाजारचा प्रश्न नसून पूर्ण खामगाव तालुक्यातील प्रश्न आहे. |
हिंगणा कारेगाव येथील पांझाडे डीपी वरलोड असल्याची तक्रार JE गोलाईत यांना वारंवार करून सुद्धा अद्याप पर्यंत साधा सर्वे सुद्धा करण्यात आला नाही,अशातच शाहापूर शिवारातील शेतकरी मेतकर बदरके व इतर शेतकऱ्यांनी वारंवार खाटीक डीपी वरलोड असल्यामुळे त्यांना वीज नसल्यामुळे शिवसेनेने वारंवार आंदोलन व तक्रार केल्यामुळे डीपी मंजूर झाली परंतु जिथें खरोखर शेतकऱ्यांना त्रास आहे तिथल लोकेशन सोडून खाटीक या नावानेच डीपी मंजूर झाल्यामुळे दुसरी dp सुद्धा खाटीक यांच्या शेताजवळ टाकण्यात येत आहे जिथ शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यकता असून सुद्धा आर्थिक देवाण-घेवांच्या भरोशावर आधी डीपी असून सुद्धा तिथेच पुन्हा dp देण्यात येत आहे हे मोठी खेदाची बाब आहे.
आज शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून येथून पुढील काळात महावितरण ने शेतकऱ्याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची महावितरण दक्षता घ्यावी व शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थांबावा अन्यथा पुढील काळात अधिकारी असो की कर्मचारी असो यांना शिवसेना धारेवर धरल्या शिवाय राहणार नाही याचा आपण गंभीर्यपूर्वक पूर्वक विचार करावा व शेतकऱ्याला सहकार्य करावे.
Post a Comment