लाडक्या बहिणींची संक्रांत गोड? होणार डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र येणार !

वृत्तसंस्था- राज्यातील लाडक्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. या हप्त्याचे पैसे कधी येणार ? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण संक्रांतीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post