आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नॅशनल मॅथेमॅटिक्स डे उत्साहात साजरा



 खामगांव - स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राष्टीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वर्ग 1 ते वर्ग 7 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध गणितीय मॉडेल, चार्ट तसेच विविध गणितीय खेळ या कार्यक्रमासाठी तयार करुन आणलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती तसेच महान गणितज्ञ् श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन तसेच दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय गणित दिवस महान गणितज्ञ् श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती ला साजरा करतात आणि गणिताचे आपल्या दैनंदिन जिवनात असणारे अनन्य साधारण महत्व त्यांनी विषद केले. तसेच या कार्यक्रमात त्यांनी तयार करुन आणलेले विविध गणितीय मॉडेल आणि खेळ या विषयी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना माहिती दिली. 

विविध गणितीय खेळ तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले गणितीय प्रोजेक्ट यामुळे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह लक्षणीय होता. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन, पर्यवेक्षिका सौ प्रियंका राजपूत,  सौ ज्योती वैराळे, कु माधुरी उगले, सौ कल्पना कस्तुरे, सौ अलका वेरूळकर, सौ प्रिया देशमुख, सौ सारिका सरदेशमुख, कु दामिनी चोपडे, सौ अक्षरा इरतकर, सौ प्रियंका वाडेकर, सौ अर्चना लाहूडकर, कु मिनल लांजूडकर, सौ नम्रता देशमुख, श्रीमती स्वाती निंबोकार, सौ कोमल आकणकर, सौ अश्विनी वकटे, श्रीमती सपना हजारे, सौ संगीता पिवळटकर, सौ वंदना गावंडे, सौ सुवर्णा वडोदे, सौ प्रतिभा गावंडे, सौ राजकन्या वडोदे, सौ मीरा कांदिलकर आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post