पत्रकार दिनाच्या निमित्ताने...
खामगांव प्रेस क्लब बैठक हर्शौल्हासात
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगांव प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा पत्रकार दिन हर्शौल्हासात साजरा करण्या करिता खामगांव प्रेस क्लब ची महत्व पूर्ण बैठक प्रेस क्लबचे सल्लागार जगदीश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खामगांव प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या खामगांव रत्न,खामगाव गौरव,आदर्श व ज्येष्ट पत्रकार स्व.बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्कार,युवा पत्रकार पुरस्कार देण्या संदर्भात तसेच ह्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्या करिता विवीध विषयावर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम उत्कृष्ट व्हावा या करिता नियोजना संदर्भात खामगांव प्रेस क्लबच्या ज्येष्ठ,श्रेष्ठ पदाधिकारी आणि सदस्यानी महत्त्वपुर्ण मार्गदर्शन व सूचना केल्या. ही महत्वपूर्ण बैठक आज दिनांक 26 /12/2024 वार गुरवार रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन येथे पार पडली या प्रसंगी खामगांव प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment