बाळापुर फईल भागातील नागरिकांची पाण्यासाठी त्राही त्राही :३८ दिवसांपासून नळाला पाणीच नाही
![]() |
महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर टाकलेली हीच ती तक्रार |
💫तक्रार पोहोचली थेट महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या वेबसाईटवर 💫पालिका प्रशासनावर तीव्र रोष 💫मुबलक पाणी असतानाही घ्यावे लागते विकत
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क (नितेश मानकर) मुबलक पाणी असतानाही केवळ नगर परिषदेच्या कासवछाप कार्यपद्धतीमुळे बाळापुर फैलातील काही भागात गेल्या 39 दिवसापासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठी त्राही त्राही होत असून तेथील पाण्याची तक्रार महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या पोर्टलवर करण्यात आली आहे.
औद्योगिक आणि समृद्ध शहर असले तरी, बाळापूर फइल परिसरातील नागरिक पाण्याच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहेत. गेल्या ३८ दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे, रहिवाशांचे जीवन नरकीय झाले आहे. स्थानिक नळांना पाणी येत नसल्याने, अनेक घरांमध्ये या भागातील नागरिकांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.तसेच, या परिसरातील अनेक घरांमध्ये विहीर किंवा बोरिंगची सुविधा नाही. मुख्यत: मजूर वर्गातील कुटुंबे या भागात राहत असल्याने, त्यांना पाणी मिळविण्यासाठी खीशाला झळ पोचउन दररोज करून १००० लिटर पाणी विकत घेण्यासाठी टँकर घेणे भाग पडते. पण हे टँकर मिळविणे देखील एक मोठे आव्हान आहे, कारण त्याची उपलब्धता आणि वेळेवर पुरवठा अडचणीचा ठरतो. त्यामुळे या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित अधिकारी यांनी यावर त्वरित कार्यवाही करणे आणि नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खामगावच्या नागरिकांना या पाणी संकटावर लवकरात लवकर समाधान मिळाले पाहिजे, अन्यथा त्यांची परिस्थिती आणखी कठीण होईल.
Post a Comment