राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे गृह, अजित पवारांकडे अर्थ तर एकनाथ शिंदेंकडे नगर विकास खाते

आकाशदादा फुंडकर यांना कामगार खाते

मुंबई : अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप 21 डिसेंबर रोजी रात्री जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाचे गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे. तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. तर बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष असलेले पावरफुल आमदार आकाश दादा फुंडकर यांना कामगार खाते देण्यात आले

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल, राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास), हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कामकाजमंत्री, गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास) आपत्ती व्यवस्थापन, गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा, गणेश नाईक – पर्यटन, दादाजी भुसे – शालेय शिक्षण, संजय राठोड – माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन, उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार, पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन, अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर, अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय, शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, अदिती तटकरे – महिला व बालविकास, शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे – कृषी, जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज असे हे देण्यात आले आहे

Advt.


हे आहेत राज्यमंत्री

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय, मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम – ग्रामविकास, पंचायत राज, पंकज भोयर – गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post