स्टेट बँकेतून संशयित महिलांना अटक :अटक महिलांवर यापूर्वी दोन गुन्हे!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्टेट बँकेच्या आवारातून काल डीबी पथकाने दोन संशयित चोरट्या महिलांना अटक केली आहे. या महिलांवर यापूर्वी देखील दोन गुन्हे दाखल आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कविता सिसोदिया व राधिका सिसोदिया दोघी राहणार मध्य प्रदेश ह्या काल स्टेट बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने आल्या होत्या. दरम्यान डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप मोठे व रवींद्र कन्नड यांनी आरोपी महिलांना पकडले. विचारलेल्या प्रश्नांची उडवा उडवी ची उत्तरे मिळाले त्यांनी या दोघींना पोलीस स्टेशन येथे आणले. त्यानंतर या दोघींवर आधीच दोन गुन्हे असल्याचेही उघड झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी ,ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Post a Comment