धक्कादायक: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: घरात झोपलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार पीडीतेचे वडील विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे दिनांक 19 रोजी रात्रीच्या वेळीशेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी पीडित ही घरी होती. दरम्यान कोनटी येथील जीवा टेळे व निकस तमनर हे दोघे एका मोटरसायकलवर आले आणि दरवाजा लोटून पिडीतेला वाईट उद्देशाने स्पर्श केला. तिने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यावरून पिडीते चया वडिलांनी हिवरखेड पोस्ट पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post