मातोश्रींनी लावला विजयी टीळा... आणि म्हणाल्या विजयीभव !
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- राज्यात विधानसभा निवडणुकीला आज मतदारांनी भरगच्च प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावला. खामगाव विधानसभा मतदारसंघात दोन वेळ निवडून आलेले आकाश दादा फुंडकर यांना यावर्षीही विजयभवचा आशीर्वाद त्यांच्या मातोश्रीनी दिला. मतदारसंघात सुमारे 70 टक्के वोटिंग झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतदार क्षेत्रातील बहुतांश मुरब्बी मतदारांनी देखील आकाश दादा फुंडकर यांना विजयाचा कौल दिल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत येत्या 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे .त्यामुळे अवघ्या काही दिवसातच विजयाची माळा आपल्याला पहावयास मिळेल. तत्पूर्वी मतदान प्रक्रिया आटोपल्या नंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करून विजयश्री मिळाल्याचा आनंद लुटला
Post a Comment