"जॉय ऑफ गिव्हिंग" चे आयोजन



दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी लायन्स क्लब संस्कृती खामगाव परिवारातर्फे खामगाव पासून 50 किमी अंतरावर असलेल्या वरदडा (मेहकर रोड) येथील आदिवासी पारधी समाज शाळेत शिकणाऱ्या १०० फासे पारधी समाजाच्या मुलांसाठी "जॉय ऑफ गिव्हिंग" चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विविध मिठाई, नमकिन असे अनेक प्रकारचे फराळ, सर्व मुलांसाठी उबदार कपडे, सर्व मुलांसाठी नवीन कपडे, भरपूर फटाके, करंजीचे बॉक्स, चकली, चॉकलेट्स, लहान-मोठे चटई, ब्लँकेट आणि इतर खाद्यपदार्थ, उपयुक्त पदार्थ वाटप करण्यात आले. या सेवा कार्यात लायन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, ज्येष्ठ सदस्य लॉ निशिकांत कानूनगो खजिनदार लॉ. गजानन सावकर यांनी स्वतः सेवा मोठ्या उत्साहाने केली.  अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post