धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

खामगाव(प्रतिनिधी)दि.१९ ऑक्टोबर -/ धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव शहरात दि.२१ऑक्टोबर रोजी स्वराज मराठा देशमुख प्रतिष्ठान खामगाव व श्रीमंत राजे लखोजीराव ेजाधव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 

जाहिरात

यामध्येखामगाव शहरात  सकाळी ९:३० वाजता सामान्य रुग्णालय येथे स्वराज मराठा देशमुख प्रतिष्ठान खामगाव व श्रीमंत राजे लखोजीराव जाधव प्रतिष्ठान खामगाव यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल त्यानंतर लायन्स अन्नछत्र येथे गरजू तसेच गरिबांना अन्नदान करण्यात येईल त्यानंतर सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येईल वरील सर्व लोकोउपयोगी उपक्रम धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित करण्यात आले आहेत धनंजय देशमुख दुपारी १२ ते सायं ५ वा पर्यंत त्यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थ केंद्राच्या मागे डीपी रोड खामगाव येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारण्या करिता उपस्थित राहतील .

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य मराठा देशमुख प्रतिष्ठान खामगाव व श्रीमंत राजे लखोजीराव जाधव प्रतिष्ठान खामगाव व धनंजय देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post