इंटरनॅशनल गॅट कॉन्क्लिव्ह "सक्षम" रिजन सुरज संपन्न.

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- दिनांक 20/10/2024 रविवार रोजी सकाळी 10.30 वाजता स्थानिक संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, ध्वजवंदना, राष्ट्रगान म्हणून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक रिजन चेअर पर्सन लॉ सुरज एम अग्रवाल यांनी केले. यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट त्यामागील उद्देश सविस्तर समजून सांगितला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डिस्टिक गव्हर्नर लॉ गिरीश सिसोदिया जळगाव यांनी केले, आपल्या उद्घाटन पर भाषणात वर्षभर करण्यात येणाऱ्या कामाच्या संदर्भात माहिती दिली, लक्ष स्वप्नांचे या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे गॅट कॉर्डिनेटर लॉ डॉ. प्रदीप गर्गे यांनी त्यातील बारकावे व लक्षपूर्ती उद्दिष्टांची यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. मल्टिपल मेंबरशिप चेअर पर्सन पीडीजी लॉ जगदीश पुरोहित कराड स्वप्नांना प्रत्यक्षात उतरण्याची कला कशी विकसित करायची या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. फर्स्ट व्हिडीजी लॉ अश्विन बाजोरिया यांनी केलेला कार्याचा प्रसार प्रचार करून त्याचा ठसा कसा उमटवला जाईल या संदर्भात मेक युवर ब्रँड यावर सखोल मार्गदर्शन केले. सेवा के साथ और सेवा के हात या विषयावर पीडीजी लॉ राजेश राऊत यांनी चित्रफित दाखवून मार्गदर्शन केले. लॉ नरेश चोपडा यांनी  सुंदर चित्रफित दाखवून उपस्थितांचे मने जिंकली.  याप्रसंगी प्रामुख्याने प्रमुख उपस्थितीमध्ये डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लॉ रितेश छोरीया, डिस्ट्रिक्ट जीएलटी जॉईंट कॉर्डिनेटर लॉ नरेश चोपडा, झोन चेअर पर्सन लॉ उज्वल गोयनका ,झोन चेअर पर्सन लॉ अनिता उपाध्याय, झोन चेअर पर्सन लॉ सत्यपाल भाषानी, रीजन सेक्रेटरी लॉ वीरेंद्र शहा, डिस्ट्रिक्ट जॉईंट पीआरओ लॉ विवेक गावंडे, याप्रसंगी 16 पैकी दहा क्लबचे पी एस टी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते व महिला सदस्यांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती. ध्वजवंदना लॉ भारती गोयनका , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, लॉ संजय उमरकर व लॉ डॉ सोनल तिबडेवाल यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे कन्व्हेनर लॉ अभय अग्रवाल यांनी केले, उपस्थित सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. लॉयन्स संस्कृती खामगाव चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष लॉ शैलेश शर्मा यांनी एमजेएफ मानकपद स्वीकारण्याचे जाहीर केले. संस्कृती क्लबच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post