परिपोषण आहार अनुदानास मंजूरी
खामगाव - महाराष्ट्र शासनाने गोमाते करीता घेतलेल्या ऐतिहासीक निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य शासन, गौशाला महासंघ, महाराष्ट्र व महा. राज्य गो सेवा आयोग ह्यांच्या प्रयत्नामुळे प्रती दिवस प्रती गोवंश अनुदान योजना व गोमातेला 'राज्यमाता' घोषीत केल्याबद्दल सर्वाचे मनापासुन धन्यवाद व अभिनंदन. प्राचीन काळी ऋषी मुनींनी निसर्ग तसेच या विश्वातील विज्ञानाचा अभ्यास करून आपल्याला एक जिवनशैली आखून दिली होती. गाईच्या पंचगव्याच्या (दुध, दही, तुप, गोमुत्र, गोमय) वापरातुन जीवनशैली उदयास येत आहे व या शिवाय पृथ्वी, जल, वायु प्रदुषणापासून वाचत आहे. देशभरात गो आधारीत ग्राम बसत आहेत. पुर्ण ब्रह्माण्ड मध्ये असे कोणतेही पशु पक्षी प्राणी नाही किंवा देव सुध्दा नाही ज्याचे मल मुत्र धार्मिक कार्यासाठी पवित्र मानले जाते, फक्त गोमातेचा पवीत्र मानल्या जाते म्हणून भारतीय संस्कृतीत गाईला गोमातेचा दर्जा आहे. असे श्री गोरक्षण संस्था खामगांव द्वारे प्रसिध्दीस देण्यात आले आहे
Post a Comment