ठरलं..! उद्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे खामगावात येणार
खामगाव-जनोपचार न्यूज नेटवर्क :- येणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री यांचा शासकीय दौरा आज वृत्तपत्र कार्यालयात येऊन धडकला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात येत आहेत. खामगाव नजिकच्या घाटपूरी येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नविन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोनशिलाचे अनावरण सकाळी त्यांच्या तसेच प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. घाटपूरी येथे श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालय चालविल्या जात आहे. हे विद्यालय श्री. जगदंबा माता मंदिर परिसरात आहे. या विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रम श्री. जगदंबामाता संस्थान घाटपुरी येथे सकाळी ७:३० ते १० वाजेदरम्यान होईल. तर नंतरचा कार्यक्रम श्रीधर महाराज बारकरी भवन घाटपूरी रोड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संदिपजी नेने, ज्योतीष चास्तू तथा आध्यात्मिक सल्लागार यांची प्रमुख उपस्थिती तर विशेष उपस्थिती म्हणून आमदार अॅड. आकाश फुंडकर, राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांची उपस्थिती लाभणार आहे. असे आयोजक जय जगदंबा वेद विद्यालयाचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, सचिव निलेश भैय्या, व्यवस्थापक पुरुषोत्तम भट्टड़, योगेश इंदोरिया तथा जय जगदंबा वेद विद्यालय कार्यकारिणी घाटपूरी राहणार आहेत
Post a Comment