भ्रातृमंडळ इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात
खामगाव-विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खामगाव येथील भ्रातृमंडळ इमारतीचा भूमिपूजन सोहळा खामगाव ग्रामीण येथील भूखंडावर मोठ्या उत्साहात पार पडला.
या भूमिपूजन सोहळ्यास उद्घाटक म्हणून आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे सचिव दिलीप नाफडे, भ्रातृमंडळ खामगावचे अध्यक्ष अनिल चौधरी, खामगाव ग्रामीणच्या सरपंच सौ. दाते, भ्रातृमंडळ बुलढाणाचे अध्यक्ष डि.टी. खाचणे, भ्रातृमंडळ बुलढाणाचे सचिव डि.के. देशमुख व सहसचिव संजयकुमार खर्चे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजयकुमार खर्चे यांनी केले. महाराष्ट्र लेबा पाटीदार महासंघाचे सचिव नाफडे यांनी जमलेल्या समाजबांधवाना संबोधन करीत सामाजिक एकता व अखंडता कायम राखण्याचे आवाहन केले तसेच भ्रातृमंडळ खामगावच्या इमारतीस बांधकामासाठी प्रारंभिकरित्या ४० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदारांचे आभार व्यक्त करून पुढील वाढीव निधीसाठी अपेक्षा व्यक्त केली. याचबरोबर महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ समाजाच्या उन्नतीसाठी करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार फुंडकर यांनी समाजभवनाच्या बांधकामास पुरेपूर मदत करण्याचे तसेच सामाजिक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी अनिल चौधरी, डी.टी. खाचणे, डॉ. प्रवीण वराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार फुंडकर यांनी आतूमंडळ खामगावला केलेल्या मदतीबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन भ्रातृमंडळ खामगावचे सर्व पदाधिकारी व लेवा महिला शक्ती भ्रातृमंडळ खामगाव यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन संजय खर्च यांनी व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण वराडे यांनी केले.याप्रसंगी खामगाव येथील सर्व लेवा समाज बांधव व खामगाव ग्रामीणचे नागरिक उपस्थित होते
Post a Comment