राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सदस्य पदी सौ निशा टिकार यांची नियुक्ती
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सदस्य पदी बोरी अडगाव येथील सौ निशा विठ्ठल टिकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती प्रदेश अध्यक्ष एडवोकेट रोहिणी एकनाथराव खडसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
यात नमूद आहे की महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश सदस्य पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजीयाताई खान, प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री. जयंतराव पाटील साहेब व आपल्या नेत्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल.पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.
Post a Comment