शेतात जावे कसे व कुठून? शेतकऱ्यांचा सवाल

चिखल रस्त्यातून मार्ग कसा काढावा...

पोलीस व महसूल विभाग कारवाई का करत नाही?

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शेगाव तालुक्यातील जलंब या गावात अवैध व्यवसायाला जसा ऊत आला आहे तसाच शेतीच्या रस्त्याचाही मोठा प्रश्न अवैध वाहतूकदारांमुळे निर्माण झाला आहे. याकडे मात्र पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी आता कुणाकडे पहावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जलंब गावालगाच्या नाल्यामधून मोठा रेतीचा उपसा सुरू आहे .मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ट्रॅक्टर द्वारे रात्रीच्या वेळी हा उपसा केला जातो. मात्र शेतीसाठी असलेल्या रस्त्याचा उपयोग होत असल्याने या रस्त्यावर आता चिखलच चिखल निर्माण झाला आहे. या समस्येबद्दल यापूर्वी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आली आहे, मात्र या निवेदनांना केराची टोकरी दाखवण्यात आल्याची ओरड होत आहे. यातील काही ग्रामस्थांनी समस्येच्या निरासन्न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post